By  
on  

'फत्तेशिकस्त' मधील कृष्णाला साद घालणारी ठुमरी ऐकलीत का?

दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित 'फत्तेशिकस्त' सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. 'फर्ज॔द' नंतर 'फत्तेशिकस्त' मध्ये शिवपर्वामधली एक वेगळी गोष्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या सिनेमातली दोन गाणी आतापर्यंत प्रेक्षकांच्या भेटीला आली आहेत. 

या सिनेमातलं नवं गाणं नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ठुमरी प्रकारातल्या या गाण्याचं नाव 'अखियाँ ये देखो कान्हा' आहे. बेला शेंडेने या गाण्याला आवाज दिला आहे. 

 

दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित 'फत्तेशिकस्त' सिनेमामध्ये चिन्मय मांडलेकर, अनुप सोनी, मृणाल कुलकर्णी. मृण्मयी देशपांडे, आस्ताद काळे, हरीष दुधाणे आदी कलाकारांच्या भुमिका आहेत. शिवपर्वाची एका थरारक घटनेचा जीवंत अनुभव प्रेक्षकांना देणारा 'फत्तेशिकस्त' 15 नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive