By  
on  

बॉलिवुड गाजवतेय आपली मराठमोळी भूमि पेडणेकर

सध्या बॉलिवुड सिनेमांमध्ये एक नाव नेहमीच अग्रेसर असतं ते म्हणजे भूमि पेडणेकर. या मराठमोळ्या अभिनेत्रीने आपल्या जिद्दीवर आणि मेहनतीवर बॉलिवुडमध्ये स्वत:चं एक स्थान निर्माण केलं आहे. 'दम लगा के हाइश्या' या .यशराज फिल्म्सच्या बॅनरअंतर्गत भूमि बॉलिवुडमध्ये लॉंच झाली. पहिल्याच सिनेमात तिने आयुष्यमान खुरानासोबत स्क्रीन शेअर केली, पण हे पदार्पण तिचं कुठल्याही  दुस-या अभिनेत्रीसारखं सहज नव्हतं. तिने या भूमिकेसाठी तब्बल 60-70 किलो वजन वाढवलं होतं आणि एका वजनदार तरुणीची भूमिका साकरली . या सिनेमाने तिला अनेक पुरस्कार मिळवुन दिले आणि तिच्या भूमिकेचंही प्रचंड कौतुक झालं. 

पण त्यानंतर भूमिने डाएट आणि व्यायामाच्या जोरावर जिद्दीने आपलं वजन पूर्वत केलं. पुन्हा हॉट आणि ग्लॅमरस भूमि नव्या भूमिका पेलण्यासाठी सज्ज झाली.  'टॉयलेट : एक प्रेम कथा' आणि 'शुभ मंगल सावधान' या मधील अभिनयासाठी तिचे विशेष कौतुक झाले.

यंदाच्या वर्षी प्रदर्शित झालेल्या सोनचिरिया, सांड की आँख आणि बाला या चित्रपटात तिने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

 

 

'पती, पत्नी और वो' या चित्रपटाव्यतिरिक्त 'डॉली किटी और वो चमकते सितारे' आणि भूत - १ द हॉन्टेड शिप' हे दोन आगामी चित्रपट  लवकरच रसिकांच्या भेटीला येत आहेत

 

सॉंड की ऑंखमधील शूटर दादी म्हणून भूमीने दमदार भूमिका साकारली

 

 

 

 

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive