अलीकडे सोशल मिडियावर फोटो शेअर करायचा झाला की त्याला अनेकदा ब्युटी फिल्टर्स लावले जातात. पण अभिनेत्री नेहा पेंड्सेने मात्र अलीकडेच तिचा नो फिल्टर फोटो शेअर केला आहे. हा फोटो थेट तिच्या बेडरुममधून आला आहे. नेहा सकाळी उठताच नो मेक अप, नो फिल्टरवाला फोटो फॅन्सशी शेअर केला आहे.
नेहाच्या या मॉर्निंग सेल्फीला खुप लाईक्स आणि कमेंट्स मिळत आहेत. नेहा अलीकडेच चर्चेत आली होती ते तिच्या साखरपुड्याच्या चर्चेमुळे. नेहाने इटलीमध्ये तिचा साखरपुडा उरकला आहे. शार्दुलसिंग असं तिच्या भावी नव-याचं नाव आहे. ही ग्लॅमरस अभिनेत्री लग्नाच्या बंधनात कधी अडकणार याची चाहतेही वाट पहात आहेत.