By  
on  

सोनी मराठीवर ‘बघतोस काय... मुजरा कर!’चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियर

सोनी मराठी वाहिनीवर महाराष्ट्राच्या वैभवाचं गुणगान करणाऱ्या गर्जा महाराष्ट्र या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक जितेंद्र जोशी यांच्या ‘बघतोस काय... मुजरा कर!’ या बहुचर्चित सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियर सोनी मराठीवर होणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं श्रद्धास्थान आणि त्यांचे किल्ले ही महाराष्ट्राचा अभिमान. पण महाराष्ट्राच्या या ऐतिहासिक वैभवाकडे तरुणाईचं होणारं दुर्लक्ष अभिनेते जितेंद्र जोशी यांच्या या सिनेमातूनअधोरेखित केलं गेलेलं आहे. नानासाहेब, पांडुरंग आणि शिवराज... या खरबुजेवाडीतल्या मावळ्यांची ही कथा येत्या १४ ऑक्टोबरला वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियरच्या निमित्तानी सोनी मराठीवर प्रेक्षक अनुभवू शकणार आहेत. शिवरायांच्या स्मारकावर होणाऱ्या खर्चाचा निम्मा भाग जरी त्यांनी बांधलेल्या किल्ल्यांच्या संवर्धनावर खर्च झाला, तरी हा सिनेमा निर्माण केल्याचं सार्थक होईल आणि महाराष्ट्राचं वैभव उजळून निघेल असं या दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात.

येत्या १४ ऑक्टोबर ला पाहायला विसरू नका बघतोस ‘काय... मुजरा कर!’ सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमीयर फक्त सोनी मराठी वर .

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive