या मराठमोळ्या गायिकेच्या स्वरसाजात सजलंय 'पानिपत'चं 'मर्द मराठा' गाणं

By  
on  

आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित 'पानिपत'ची सर्वांना उत्सुकता आहे. मराठेशाहीचा धगधगता इतिहास या सिनेमातून जिवंत होणार आहे. या सिनेमातलं पहिलं मर्द मराठा हे गाणं सर्वांच्या भेटीला आलं आहे. अजय-अतुलने हे संगीतबद्ध केलेल्या या गाण्याला आशुतोष गोवारीकर यांनी भव्य रूप मोठ्या पडद्यावर आणलं आहे. पण हे गाणं गाणारे गायक मराठमोळे आहेत हे तुम्हाला माहित आहे का?

 

'मर्द मराठा' हे गाणं ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी लिहिलं आहे. जावेद अख्तर यांच्या शब्दांना आवाज दिला आहे मराठमोळ्या गायकांनी. स्वप्नील बांदोडकर, प्रियंका बर्वे, पद्मनाभ गायकवाड या गायकांनी 'मर्द मराठा' गाण्याला आवाज दिला आहे. स्वप्नील बांदोडकर आणि प्रियंका बर्वे ही नावं सर्वांना माहित आहेत. प्रियंका बर्वेने मराठी तसेच इतर भाषांमध्ये अनेक गाणी गेली आहेत. तसेच अनेक कार्यक्रमांचे तिने सूत्रसंचालन सुद्धा केले आहे. हा यांच्याशिवाय कुणाल गांजावाला, सुदेश भोसले आदी लोकप्रिय गायकांनी सुद्धा 'मर्द मराठा' हे गाणं एकत्रितरित्या गायलं आहे. 

आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित 'पानिपत' सिनेमात अर्जुन कपूर, क्रिती सेनॉन, मोहनीश बेहेल, पद्मिनी कोल्हापुरे, रवींद्र महाजनी आदी कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा सिनेमा ६ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  

Recommended

Loading...
Share