#पुन्हा निवडणुक? या हॅशटॅगमागचा अर्थ उलगडला, वाचा सविस्तर

By  
on  

येत्या काही दिवसांमध्ये मराठी कलाकारांनी ट्विटर पोस्ट केलेला '#पुन्हा निवडणुक' हा हॅशटॅग चांगलाच ट्रेन्डिंग होता. अखेर यामागचा अर्थ उलगडला असुन झी स्टुडिओच च्या आगामी 'धुरळा' सिनेमाच्या प्रमोशननिमित्त हा हॅशटॅग कलाकारांनी वापरला होता. 

नुकतचं झी स्टुडिओजने 'धुरळा' सिनेमाची घोषणा सोशल मिडीयावर केली असुन #पुन्हा निवडणुक या हॅशटॅगमागचा अर्थ कळाला आहे. 'आनंदी गोपाळ' नंतर समीर विद्वांसचा दिग्दर्शक म्हणुन हा पुढील सिनेमा असणार आहे. क्षितीज पटवर्धन या सिनेमाच्या लेखनाची धुरा सांभाळत आहेत. 

या सिनेमात अंकुश चौधरी, सोनाली कुलकर्णी, अमेय वाघ, सिद्धार्थ जाधव, प्रसाद ओक या कलाकारांच्या प्रमुख भुमिका आहेत. हा सिनेमा 3 जानेवारी 2020 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Recommended

Loading...
Share