या व्यक्तीच्या आठवणीने प्रशांत दामले यांना झाले अश्रू अनावर

By  
on  

कलर्स मराठीवर 'दोन स्पेशल' हा कार्यक्रम अल्पावधीत प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात यशस्वी झाला आहे. जितेंद्र जोशीचे खुमासदार सूत्रसंचालन आणि सेलिब्रिटींना प्रश्न विचारण्याची त्याची हटके स्टाईल यामुळे 'दोन स्पेशल'ने प्रेक्षकांचं मन जिंकण्यात यश मिळवले आहे. नुकतीच या कार्यक्रमात प्रशांत दामले आणि कविता मेढेकर-लाड यांनी हजेरी लावली. 

यावेळेस प्रशांत दामले एका व्यक्तीच्या फोटोवर बोलताना भावुक झाले. ही व्यक्ती म्हणजे दिवंगत नाट्यनिर्माते सुधीर भट. सुधीर भट यांच्या 'सुयोग' नाट्यसंस्थेच्या अनेक नाटकांमध्ये प्रशांत दामले यांनी अभिनय केला. ''कलाकाराला सपोर्ट करणारा माणूस असतो तो म्हणजे सुधीर भट. सुधीर भट यांनी सातत्याने मला नाटकांमध्ये घेतलं म्हणून गेली ५०-५५ वर्ष मी नाटकांमध्ये जे काही करू शकलो ते त्यांच्यामुळे'', अशा शब्दात प्रशांत दामले यांनी सुधीर भट यांच्याविषयी भावना व्यक्त केल्या. 

'दोन स्पेशल' मध्ये प्रशांत दामले सुधीर भट यांच्याविषयी भावना व्यक्त प्रशांत दामले यांच्यासह कविता मेढेकर-लाड सुद्धा भावुक झाल्या. प्रशांत-कविता ही जोडी मराठी रंगभूमीवर गाजली आहे. 'एका लग्नाची गोष्ट' या नाटकातून या जोडीला प्रेक्षकांचं प्रेम मिळालं. सध्या 'एका लग्नाची पुढची गोष्ट' या नाटकातून हे दोघे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. 

Recommended

Loading...
Share