By  
on  

रंगणार.... ‘आयुष्यावर बोलू काही’

समाजातील अनेक व्यक्ती वा संस्था उपेक्षित, वंचित घटकांकरता रचनात्मक व अभिनव उपक्रम सातत्याने राबवत त्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असतात. ‘आपल्याला जे आणि जसं मिळत ते आणि तसंच इतरांनाही मिळावं’ या सामाजिक जाणिवेतून ‘मॅक्सविंग्ज’ मीडिया च्या सर्वेसर्वा रुणाली पाटील यांनी आजवर बऱ्याच सामाजिक कार्यात पुढाकार घेतला आहे. त्यांच्या याच पुढाकारातून खास काव्य-संगीताचा नजराणा असलेल्या सलील कुलकर्णी आणि संदीप खरे यांचा गाजलेला ‘आयुष्यावर बोलू काही’ हा कार्यक्रम शिवाजी मंदिर येथे येत्या बुधवार २० नोव्हेंबर सायं ७.३० वा. आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमा दरम्यान आदर्श शिंदे यांनी गायलेले गुरु ठाकूर यांनी लिहिलेले आणि चैतन्य आडकर यांनी संगीतबद्ध केलेल्या क्षितिज ग्रुपच्या (थीम साँग) च्या गीताचा लोकार्पण सोहळा होणार आहे.

आनंद अनाथ आश्रमातील मुले,  वृद्धाश्रमातील वृध्द, अंध आश्रमातील अंध, त्याचं प्रमाणे मुंबई महानगर पालिकेतील सफाई कामगार आणि त्याच बरोबर ‘मॅक्सविंग्स’ मीडिया चे कर्मचारी, क्षितिज ग्रुपचे कर्मचारी आणि मुंबई डबेवाला संघटने चे सभासद आणि कुटुंबीय यांच्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या काही मोफत प्रवेशिका शिवसेना भवन जवळ असलेल्या मॅक्सविंग्ज मीडियाच्या कार्यालयात उपलब्ध आहेत.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे उपनेते आणि मुंबई महानगरपालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे, सुप्रसिद्ध गीतकार गुरु ठाकूर असे विविध क्षेत्रातील मान्यवर आवर्जून उपस्थित राहणार आहेत.

Recommended

PeepingMoon Exclusive