By  
on  

'इफ्फी'च्या सुवर्णमहोत्सवी वर्षामध्ये मराठी सिनेमांचा 'षटकार'

जगभरात मानाचा सिनेमहोत्सव म्हणुन समजल्या जाणा-या 'इफ्फी' या आंतरराष्ट्रीय सिनेमहोत्सवाला लवकरच सुरुवात होणार आहे. यंदा या सिनेमहोत्सवाचं सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. यावर्षी इफ्फीमध्ये तब्बल सहा मराठी सिनेमांचं स्क्रिनींग करण्यात येणार आहे. 

'इफ्फी'मधील इंडियन पॅनोरमा विभागात यंदा समीर विद्वांस दिग्दर्शित 'आनंदी गोपाळ', सुजय डहाके दिग्दर्शित 'तुझ्या आयला', शिवाजी लोटन पाटील दिग्दर्शित 'भोंगा', अनंत महादेवन यांच्या 'माई घाट: क्राईम' नं 103/2005', आदित्य राही आणि गायश्री पाटील यांच्या 'फोटोफ्रेम', याचसोबत स्मिता तांबेची प्रमुख भुमिका असलेल्या 'गढुळ' सिनेमाची सुद्धा सर्वांना उत्सुकता आहे. तसेच सुवर्ण मयुर पुरस्कारासाठी यंदा अनंत महादेवन यांच्या 'माई घाट: क्राईम' नं 103/2005' या एकमेव मराठी सिनेमाची निवड करण्यात आली आहे. 

20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान गोव्यामध्ये इफ्फी हा सिनेमहोत्सव संपन्न होणार आहे. जगभरातले सिनेरसिक हा सिनेमहोत्सव पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

Recommended

PeepingMoon Exclusive