पाहा Teaser: राजकारणाचा उडणार हा मल्टिस्टारर 'धुरळा'

By  
on  

सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण बघता पुन्हा निवडणूक होणार का, हा प्रश्न सर्वांना पडणार आहे. पण लवकरच थिएटर मध्ये निवडणुकांचा माहोल रंगणार आहे. समीर विद्वांस दिग्दर्शित आणि क्षितिज पटवर्धन लिखित धुरळा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मराठी सिनेसृष्टीतले अनेक लोकप्रिय कलाकार या सिनेमात एकत्र पाहायला मिळणार आहेत. 

'धुरळा' सिनेमाचा टीजर नुकतंच प्रदर्शित झाला असून ग्रामीण भागातील राजकारणावर हा सिनेमा आधारित असल्याचं पाहायला मिळत आहे. या सिनेमात अंकुश चौधरी, सई ताम्हणकर, सिद्धार्थ जाधव, अमेय वाघ, उमेश कामत, अल्का कुबल, सोनाली कुलकर्णी या कलाकारांची फौज या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

 

समीर विद्वांस दिग्दर्शित आणि क्षितिज पटवर्धन लिखित 'धुरळा' सिनेमाची निर्मिती झी स्टुडिओजने केली आहे. हा सिनेमा नव्या वर्षात ३ जानेवारी २०२० रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Recommended

Loading...
Share