पाहा अभिनेत्री उर्मिला कोठारेचं ग्लॅमरस फोटोशूट

By  
on  

आपल्या सहज सुंदर अभिनयाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी म्हणजे अभिनेत्री उर्मिला कोठारे. दुनियादारी, मला आई व्हायचंय या सारख्या सिनेमांमधून उर्मिलाने आपल्या अभिनयाची छाप पाडली. एक सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून तिच्याकडे ाज पाहिलं जातं. नुकतंच तिने एक ग्लॅमरस फोटोशूट केलं आहे, जे पाहून तुम्ही म्हणाल वॉव. 

 ती नेहमीच सोशल मिडीयावर सक्रीय असते. डान्स व्हिडीओज, मुलगी जिजासोबतची खट्याळ मस्ती, पती आदिनाथसोबतचे फोटो शेअर करत असते.

मुलगी जिजाच्या जन्मानंतर उर्मिलाने काही संपूर्ण फक्त तिलाच वेळ दिला आणि आता पुन्हा नव्या जोमाने ती आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित करतेय.पण तरीही यादरम्यान ती आपल्या नृत्यकलेला विसरली नाही. ती तिचं नृत्य अदाकारीने नेहमीच मनं जिंकते. काही दिवसांपूर्वीच उर्मिला एका अॅड फिल्ममध्ये झळकली होती. दुनियादारी, काकण, मला आई व्हायचंय अशा सिनेमांमधून आपल्या अभिनयाची छाप पाडणारी उर्मिला आता कोणत्या सिनेमाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार याची सर्वांना उत्सुकता आहे. 

Recommended

Loading...
Share