अभिनेत्री स्पृहा जोशी झळकणार या लोकप्रिय हिंदी वेबसिरीजच्या सीक्वेलमध्ये

By  
on  

मराठी सिनेसृष्टीतले कलाकार हिंदीमध्ये झळकणं काही नवं नाही. नाना पाटेकरांपासुन ते सई ताम्हणकरपर्यंत अनेक कलाकारांनी हिंदी सिनेसृष्टीत स्वतःच्या अभिनयाची छाप पाडली आहे. या कलाकारांच्या यादीत आता मराठीमधली सुंदर अभिनेत्री आणि उत्तम निवेदिका स्पृहा जोशीचं नाव समाविष्ट झालं आहे. 

स्पृहा जोशी 'रंगबाज फिर से' या आगामी वेबसिरीजमध्ये झळकणार आहे. स्पृहाने सोशल मिडीयावरुन ही माहीती शेयर केली. ही वेबसिरीज 2018 साली आलेल्या 'रंगबाज' या वेबसिरीजचा सिक्वेल असणार आहे. स्पृहाची यामध्ये कोणती भुमिका साकारणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. 

 

'रंगबाज फिर से' मध्ये स्पृहासह हिंदी सिनेसृष्टीतले मातब्बर कलाकार झळकणार आहेत. त्यामध्ये तिग्मांशु धुलिया, साकीब सलीम, जिमी शेरगिल आणि मराठमोळा शरद केळकर सुद्धा पाहायला मिळणार आहे.

Recommended

Loading...
Share