पाहा Trailer: कोण करतेय विक्की वेलिंगकरचा पाठलाग? होईल का तिची सुटका?

By  
on  

सोनाली कुलकर्णी, स्पृहा जोशी अभिनीत विक्की वेलिंगकरचा ट्रेलर रसिकांच्या भेटीला आला आहे. टीजर प्रमाणेच ट्रेलरमध्येही मास्क मॅनबाबतची उत्सुकता ताणली जाते. विक्की वेलिंगकर म्हणजेच सोनाली कुलकर्णी एक कार्टुनिस्ट आहे. पण तिच्याकडे सध्या काम नसल्याने ती बेरोजगार आहे. पण तिला भिती आहे. एका मास्क मॅनची जो हातात गन घेऊन तिचा पाठलाग करत आहे.

 

 

या एकंदरीत प्रकरणाला हॅकिंगची देखील किनार आहे. या कोड्याच्या जाळ्यात विकी पुरती अडकली आहे. या दरम्यान एक खुन देखील होतो. हे कोडं उलगडण्यासाठी स्पृहा जोशी आणि संग्राम समेळ तिची मदत करताना दिसत आहेत. विक्कीच्या जीवावर उठलेला हा मास्क मॅन कोण आहे? त्याला विक्की कडून काय हवं आहे हे मात्र सिनेमातच कळेल. 

 

सौरभ वर्मा यांचे दिग्दर्शन असलेल्या ‘विक्की वेलिंगकर’मध्ये सोनाली कुलकर्णी, स्पृहा जोशी, विनिता खरात, केतन सिंग, जुई पवार, गौरव मोरे, संग्राम समेळ आणि रमा जोशी यांच्या भूमिका आहेत.  ‘विक्की वेलिंगकर’ हा चित्रपट ६ डिसेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.

Recommended

Loading...
Share