रिंकू राजगुरु झळकणार या वेबसिरीजमध्ये, हा अभिनेता असेल सोबत

By  
on  

रिंकू राजगुरु आता वेबमाध्यमात पदार्पण करणार असल्याचं आम्ही तुम्हाला सांगितलं होतंच. आता या वेबसिरीजबद्दल अधिक माहिती समोर येताना दिसत आहे. रिंकू आगामी वेबसिरीजमध्ये अभिनेता ताहिर शब्बीरसोबत झळकणार असल्याचं समोर येत आहे. ताहिरने अलीकडेच रिंकूचा फोटो  सोशल मिडियवरून शेअर केला होता.

 

‘100’ असं या वेबसिरीजचं नाव असल्याची माहिती सुत्रांकडून समजली आहे. या फोटोंमधील रिंकूच्या लूकवरून ती डॉक्टरांच्या व्यक्तिरेखेत दिसणार असल्याचं समोर येत आहे. या वेबसिरीजमध्ये अभिनेत्री लारा दत्तादेखील दिसणार आहे. ही वेबसिरीज हॉटस्टारवर प्रसारित होणार आहे.

Recommended

Loading...
Share