अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने को स्टार अमित खेडेकरला या अंदाजात केलं विश

By  
on  

अलीकडे सोनाली कुलकर्णी अभिनीत ‘हिरकणी’ सिनेमा रिलीज झाला. या सिनेमातील सोनालीच्या अभिनयाचं कौतुक झालं. या भूमिकेसाठी तिने घेतलेल्या कष्टांचं कौतुक तिला मिळालं. 'हिरकणी' शिवाय या सिनेमामधील आणखी एक व्यक्तिरेखा प्रेक्षकांना आवडली ती म्हणजे 'जिवा'. 'जिवा'ही व्यक्तिरेखा साकारली आहे अभिनेता अमित खेडेकर याने. आज अभिनेता अमित खेडेकर याचा वाढदिवस आहे.

 

 

अमितला सोनाली खेडेकरने खास अंदाजात विश केलं आहे. सोनालीने तिचे जीवासोबतचे फोटो शेअर केले आहेत. या पोस्टला कॅप्शन देताना ती म्हणते, 
‘या मर्दाच्या कारभारनी कडनं, धनी..तुमास्नी वाढदिवसाच्या शुभेच्छा, तुमी जिवापाड जपलं नसतं तर येवडी मोठी कामगिरी केल्यीच नसती बघा...  #हिराजीवा #हिरकणी #जिवाजीराव’. अमितने यापुर्वी हृदयानंतर या सिनेमात काम केलं आहे. आता हिरकणी सिनेमातील त्याच्या कामाचं कौतुक होत आहे.

Recommended

Loading...
Share