तरुणाईचा लाडका अमेय वाघ पुन्हा एकदा झळकणार आगामी वेबसीरिजमध्ये

By  
on  

सध्याच्या तरुणाईच्या गळ्यातला ताईत म्हणजे अभिनेता अमेय वाघ. नाटक, टीव्ही, सिनेमा अशा विविध माध्यमांमध्ये अमेय स्वतःच्या अभिनयाची छाप पाडत आहे. अमेय वाघ लवकरच एका आगामी वेबसिरीजच्या माध्यमातुन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

वेबमाध्यम अमेयला काही नवं नाही. अमेयने आजवर अनेक वेबसिरीजमध्ये आणि वेब शो मध्ये चमकदार कामगिरी बजावलो आहे. 'ब्रोचारा' असं अमेयच्या आगामी वेबसिरीजचं नाव असुन यामध्ये अमेयसह वेबस्टार ध्रुव सेहगल सुद्धा झळकणार आहे. 

 

अमेय वाघ नुकतंच 'सेक्रेड गेम्स 2' या वेबसिरीजमध्ये झळकला होता. तसेच आगामी 'धुरळा' या मराठी सिनेमामधुन अमेय वाघ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Recommended

Loading...
Share