By  
on  

स्पृहा जोशी 'रंगबाज फिर से' मध्ये जिमी शेरगिलसोबत करणार स्क्रीन शेयर

मराठी सिनेसृष्टीतले कलाकार हिंदीमध्ये झळकणं काही नवं नाही. नाना पाटेकरांपासुन ते सई ताम्हणकरपर्यंत अनेक कलाकारांनी हिंदी सिनेसृष्टीत स्वतःच्या अभिनयाची छाप पाडली आहे. या कलाकारांच्या यादीत आता मराठीमधली सुंदर अभिनेत्री आणि उत्तम निवेदिका स्पृहा जोशीचं नाव समाविष्ट झालं आहे. 

स्पृहा जोशी 'रंगबाज फिर से' या आगामी वेबसिरीजमध्ये झळकणार आहे. या वेबसीरिजमध्ये स्पृहा जोशी अभिनेता जिमी शेरगील सोबत झळकणार आहे. या वेबसीरिजमध्ये स्पृहा जोशी रुक्मिणी नावाची भूमिका साकारत आहे. 

 

स्पृहाने सोशल मिडीयावरुन तिचा फर्स्ट लूक शेयर करत ही माहीती शेयर केली. ही वेबसिरीज 2018 साली आलेल्या 'रंगबाज' या वेबसिरीजचा सिक्वेल असणार आहे. स्पृहाची यामध्ये कोणती भुमिका साकारणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे.  

'रंगबाज फिर से' मध्ये स्पृहासह हिंदी सिनेसृष्टीतले मातब्बर कलाकार झळकणार आहेत. त्यामध्ये तिग्मांशु धुलिया, साकीब सलीम,  आणि मराठमोळा शरद केळकर सुद्धा पाहायला मिळणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive