By  
on  

भूषण प्रधानचा वाढदिवसानिमित्त हा संकल्प

मराठी सिनेसृष्टीतील हँडसम अभिनेता आणि तरुणींच्या गळ्यातला ताईत म्हणजे अभिनेता भूषण प्रधान. आज भूषण प्रधानचा वाढदिवस आहे. सामान्य व्यक्तीपासून ते अगदी सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येक जण स्वतःचा वाढदिवस उत्साहात साजरा करतात. पण अभिनेता भूषण प्रधानने मात्र आपल्या वाढदिवस काहीश्या वेगळ्या पद्धतीने साजरा करायचा ठरवला आहे. 

भूषण प्रधानने इंस्टाग्रामवर बीचवर धावतानाचा शर्टलेस हॉट फोटो शेयर करून वाढदिवशी फिट अँड फाईन राहण्याचा संकल्प केला आहे. भूषणने या फोटोच्या खाली 'वाढदिवस हा आरोग्यासाठी महत्वाचं असतो. तुम्ही जितके जास्त वाढदिवस साजरे कराल तितके तुम्ही जास्त आयुष्य जगाल', असं कॅप्शन भूषणने या फोटोखाली लिहिलं आहे. 

लवकरच भूषण रायमा सेन या अभिनेत्रीसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाला आहे. तसेच भूषण'गोंद्या आला रे' या मराठी वेबसीरिजमध्ये झळकला होता. पिपिंगमुन मराठीतर्फे भूषणला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 

Recommended

PeepingMoon Exclusive