By  
on  

मराठी इंडस्ट्रीतली 'अप्सरा' आता परीक्षकाच्या भुमिकेत

स्वतःच्या सुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी. अनेक मराठी सिनेमांमध्ये वैविध्यपुर्ण भुमिका साकारुन सोनालीने सर्वांची मनं जिंकली आहेत. आता सोनाली एका नव्या भुमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एका नव्या डान्स रिअॅलिटी शो मधुन सोनाली परीक्षकाच्या भुमिकेत पाहायला मिळणार आहे. 

'युवा डान्सिंग क्वीन' असं या कार्यक्रमाचं नाव असुन मराठी सिनेसृष्टीतील अनेक लोकप्रिय अभिनेत्री या कार्यक्रमात स्पर्धक म्हणुन थिरकताना दिसतील. लोकसंगीत आणि माॅडर्न या दोन्ही प्रकारात या अभिनेत्री नृत्य सादर करताना दिसतील. सोनाली या कार्यक्रमात तिच्या खास अंदाजात परीक्षण करताना दिसणार आहे. 

 

सोनालीसह अभिनेता-दिग्दर्शक अद्वैत दादरकर या शो चं सुत्रसंचालन करताना दिसणार आहे. सोनालीसह आणखी एक परीक्षक दिसणार आहे, मात्र तो कोण हे अद्याप गुलदस्त्यात आहे. या कार्यक्रमाचा टिझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला असुन 11 डिसेंबरपासुन बुधवार-शुक्रवार रात्री 9.30 वाजता हा कार्यक्रम झी युवा चॅनलवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

'हिरकणी' नंतर 'विक्की वेलिंगकर', 'धुरळा' या सिनेमात झळकणारी सोनालीला परीक्षकाच्या भुमिकेत पाहण्यास तिचे चाहते उत्सुक आहेत.

Recommended

PeepingMoon Exclusive