By  
on  

आता आमदारांच्या हॉटेलची बिलं शेतकरी चुकवणार का? सुमीत राघवनचा सवाल

महाराष्ट्रात काही दिवसांपुर्वी सत्यानाट्य घडलं जे प्रत्येकाने पाहिलं. निर्वाचित आमदारांना एकत्र ठेवण्यासाठी पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवले होते.  यापैकी या हॉटेलचं एका दिवसाच्या खोलीचं भाडं जवळपास 12 ते 15 हजाराच्या घरात होतं. 
या कालावधीत सत्तेसाठी झालेली नासाडी पाहता अभिनेता सुमीत राघवनचं मन व्यथित झालं आहे. त्याने यावर ट्वीट करून आपल्या क्षोभाला वाट करून दिली आहे.

 

 

सुमीत म्हणतो, ‘ट्रायडंट, मॅरिएट, रेनेसन्स, हयात, ललित, , या हॉटेल्सनी त्यांच्या मेनूकार्डमधून ‘खिचडी’ हा पदार्थ वगळावा. पण आता या हॉटेल्सची बिलं कोण भरणार? बहुधा शेतकरी’,. सुमीत अनेकदा सामान्य व्यक्तीच्या प्रश्नावर आवाज उठवताना दिसतो. अलीकडे त्याने मेट्रोच्या बाबतीतही सकारात्मक ट्वीट केलं होतं. त्यावरून त्याला अनेकांनी ट्रोलही केलं होतं.

Recommended

PeepingMoon Exclusive