जबरदस्त! 'दबंग 3' मध्ये झळकतंय मांजरेकर कुटुंबिय

By  
on  

सलमान खानच्या 'दबंग 3' ची सर्वांना  उत्सुकता आहे. या सिनेमात सलमानसोबत महेश मांजरेकरांची मुलगी सई मांजरेकर आहे. सई या सिनेमाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे. पण आता 'दबंग 3'  विषयी एक रंजक माहिती समोर येत आहे. ती म्हणजे या सिनेमात सईचे खऱ्या आयुष्यातील आई-बाबा अर्थात महेश मांजरेकर आणि मेधा मांजरेकर 'दबंग 3'  सुद्धा स्क्रीन शेयर करणार आहेत. 

यासंबंधात एका आघाडीच्या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सई मांजरेकर म्हणाली,''दबंग 3 शूटिंगदरम्यान आई आणि बाबा दोघंही सेटवर हजर असल्याने माझ्यासाठी आनंदाचं वातावरण होतं. सिनेमाच्या एका सीनमध्ये आम्ही तिघं एकत्र झळकणार आहोत. माझ्या पदार्पणाच्या सिनेमात असा योगायोग मिळणं म्हणजे माझं भाग्यच आहे.'' 

महेश मांजरेकर 'दबंग 3' मध्ये हरिया ही व्यक्तिरेखा साकारत आहे. तर हरियाची पत्नी म्हणून मेधा मांजरेकर झळकणार आहेत. सलमान खानने मेधा मांजरेकर यांचं नाव सुचवलं आहे. सलमान खानची प्रमुख भूमिका असलेला प्रभुदेवा दिग्दर्शित 'दबंग 3' हा सिनेमा २० डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

Recommended

Loading...
Share