पाहा Photo: स्मिता गोंदकर केवळ सौंदर्याचीच नाही तर आहे वेगाचीही राणी

By  
on  

अनेक अभिनेत्री अभिनयासोबत आपले छंदही जोपासत असतात. हॉट आणि ग्लॅमरस अभिनेत्री स्मिता गोंदकरचा छंद मात्र काहीसा हटके आहे. स्मिताला बाईक रेसिंगची आवड आहे. स्मिताने आजवर अनेक रेसिंग स्पर्धामध्ये भाग घेतला आहे. अहुरा रेसिंग या टीमचाही ती भाग आहे. यात तिच्या टीममध्ये सगळ्या मुलीच आहेत.  

याशिवाय स्मिताने ‘जे के टायर फेस्टीव्हल ऑफ स्पीड 2019’ या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. स्मिता म्हणते, ‘जे के टायर यांच्याकडून मला फोन आला होता. त्यांनी ‘जे के टायर फेस्टीव्हल ऑफ स्पीड 2019’ या स्पर्धेमध्येही भाग घेतला होता. मला त्यात भाग घेऊन त्यात आनंद झाला.’ 

या दरम्यान तिने अनेक अनुभवही शेअर केला. सुदैवाने मी रेसिंग आणि वाहनांसंबधी तांत्रिक बाबी पटकन शिकते. हा सोपा खेळ नक्कीच नाही. पण माझ्या रेसिंगवरील प्रेमाने हे शक्य होतं.’ 

रेसिंग हा खर्चिक खेळ असल्याचंही ती मान्य करते. पण तुम्हाला धाडसाची अनुभूती करून देतो हे देखील ती मान्य करते.

Recommended

Loading...
Share