सोनाली कुलकर्णीचा हा ब्लॅक आणि व्हाईट अंदाज पाहून तुम्ही व्हाल फिदा

By  
on  

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीला नुकताच महाराष्ट्राचा फेव्हरिट कोण या रंगारंग अवॉर्ड सोहळ्यात हिरकणी सिनेमासाठी सर्वौत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. काही दिवसांपुर्वीच सोनालीने आपले ब्लॅक आणि व्हाईट असे अप्रतिम फोटोसोशल मिडीयावर चाहत्यांसोबत शेअर केले. चाहत्यांना तिचा हा अंदाज खुप भावला आणि सिनेसृष्टीसह सर्वांनीच तिच्यावर लाईक्स आणि कॉमेंट्स करुन दाद दिली आहे. 

 अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘विक्की वेलिंगकर’मध्येसुध्दा सोनाली कुलकर्णीची प्रमुख भूमिका आहे. सोनालीला मिळालेलल्या पुरस्कारावरुन आणि तिच्यावर होणा-या प्रेमाच्या वर्षावावरुन ती चाहत्यांची किती लाडकी आहे, याचा अंदाज बांधता येतोय. आता नव्या वर्षात ती कोणत्या आगामी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार याची सर्वत्र उत्सुकता लागून राहिली आहे.

 

Recommended

Loading...
Share