By  
on  

मराठी सिनेमावाल्यांचे वऱ्हाड निघाले युरोपला

मराठी चित्रपटांचं चित्रीकरण परदेशात होणं आता काही नवीन नाही. मराठी सिनेमावाल्यांचं लंडन हे आवडतं ठिकाण बनलं असल्याचं, यावर्षी प्रदर्शित झालेल्या काही बिगबजेट चित्रपटांमधून दिसून आलं आहे. मराठी बॉक्स ऑफिसवर नजर टाकली असता, अनेक चित्रपटांचे चित्रीकरण परदेशात होत असल्याचे पाहायला मिळत आहे, ज्यात केवळ लंडनच नव्हे, तर युरोपमध्येही मराठी सिनेमावाल्यांनी आपलं बस्तान मांडलं असल्याचं कळतंय. सूत्रांच्या माहितीनुसार, मराठीतील आगामी ४ चित्रपटांचे चित्रीकरण युरोपमध्ये केले जाणार आहेत.

निर्माते अमेय विनोद खोपकर यांच्या एव्हीके इंटरटेन्टमेंट प्रस्तुत यावर्षी सुपरहिट ठरलेल्या 'ये रे ये रे पैसा २'च्या अभूतपूर्व यशानंतर हेमंत ढोमे दिग्दर्शित 'झिम्मा', प्रियदर्शन जाधव दिग्दर्शित 'जागो मोहन प्यारे' आणि महेश मांजरेकर दिग्दर्शित 'दे धक्का २' ह्या आगामी चित्रपटांमधूनही प्रेक्षकांना लंडनदर्शन होणार आहे. शिवाय नवीन वर्षाची दणक्यात सुरुवात करताना, अमेय विनोद खोपकर यांनी आणखीन चार चित्रपटांची कामं हातात घेतली आहे, ज्यांचे चित्रीकरण कॅनडा, मॉरिशस आणि युरोपमध्ये होणार असल्याचे सुत्रांकडून कळून येते. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive