‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’ यानंतर दिग्पाल लांजेकर घेऊन येत आहेत ‘जंगजौहर’

By  
on  

सध्या ऐतिहासिक सिनेमांचा ट्रेंड सर्वत्र सुरु आहे. या ट्रेंडमध्ये आता ऐतिहासिक सिनेमांची भर पडणार आहे. फर्जंद आणि फत्तेशिकस्तच्या यशानंतर दिग्पाल लांजेकर आगामी जंगजौहर सिनेमाच्या तयारीला लागले आहेत. हा सिनेमा दिग्पाल यांच्या ऐतिहासिक सिनेमांची हॅटट्रिक पुर्ण होईल. या सिनेमात बाजीप्रभू आणि बांदल सेना यांच्या पावनखिंडीतील पराक्रमाची गाथा या सिनेमातून रसिकांच्या भेटीला येणार आहे.

 

 

या सिनेमाचं दिग्पाल लांजेकर दिग्दर्शन करत आहे. अजय आरेकर आणि अनिरुद्ध आरेकर या सिनेमाची निर्मिती करत आहेत. 2020मधील जूनमध्ये हा सिनेमा रसिकांच्या भेटीला येईल.

Recommended

Loading...
Share