By  
on  

खुश्बू आणि तितीक्षा तावडे आता सर्व्ह करणार कॉफी

मराठमोळ्या अभिनेत्रीसुध्दा आता काही मागे नाहीत. बॉलिवुडकरांसारखेच ते सुध्दा अभिनयासोबत जोडव्यवसाय करताना आता सर्रास पाहायला मिळतात. खुश्बू आणि तितीक्षा तावडे या दोन अभिनेत्री बहिणींनीसुध्दा आपला एक नवा व्यवसाय सुरु केला आहे.  नवीन वर्षात दोघीही अभिनयासोबतच आपल्या आवडत्या प्रेक्षकांना आणि ग्राहकांना कॅफे सर्व्ह करताना दिसणार आहेत. तितीक्षाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर कॉफी बनवतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच त्यांनी त्याच्या कॅफेचं काम सुरू असतानाचा फोटो देखील पोस्ट केले आहेत. 

तावडे भगिनी 'पॉकेट फुल ऑफ स्टोरीज' या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून विविध गोष्टी शेअर करत असतात. आता या त्यांच्या  नव्या कॅफेचं काम सुरु असल्याच्या पोस्ट या भगिनींनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. आता तावडे भगिनी प्रेक्षकांना कॉफी सर्व्ह करताना पाहायला मिळणार आहेत. 

 

खुश्बू आणि तितीक्षा तावडे या भगिनींच्या नव्या व्यवसायासाठी संपूर्ण मनोरंजन विश्वातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 

 

Recommended

PeepingMoon Exclusive