‘आई कुठे काय करते’ मालिकेतून दीपाली पानसरेचं मालिका विश्वात कमबॅक

By  
on  

स्टार प्रवाहवर २३ डिसेंबरपासून सायंकाळी ७.३० वाजता सुरु होणाऱ्या ‘आई कुठे काय करते’ या मालिकेच्या प्रोमोजनी सध्या सर्वांचच लक्ष वेधून घेतलं आहे. आईच्या भावविश्वाचा शोध घेणाऱ्या या मालिकेतून दीपाली पानसरे मालिका विश्वात दमदार कमबॅक करणार आहे. दीपालीच्या देवयानी या मालिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालं होतं. त्यानंतर जवळपास ५ वर्षांनंतर दीपाली स्टार प्रवाहच्या ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून भेटीला येणार आहे. दीपालीच्या व्यक्तिरेखेचं नाव आहे संजना. अतिशय स्मार्ट, करिअरला महत्त्व देणारी आणि आत्मविश्वासू अशी तीची व्यक्तिरेखा आहे. नुकतीच या मालिकेची पत्रकार परिषद पार पडली. पत्रकारांच्या आईंना यानिमित्ताने सन्मानित करण्यात आलं. आईविषयीची भावना व्यक्त करताना याप्रसंगी प्रत्येकजण भावूक झाला होता.

‘आई कुठे काय करते’ या मालिकेविषयी सांगताना संजना म्हणाली, ‘ही मालिका प्रत्येकाला आपल्या घरातलीच वाटेल. आपल्या सुखासाठी आयुष्यभर झटणाऱ्या या माऊलीला आपण नेहमीच गृहित धरतो. कामाच्या गडबडीत बऱ्याचदा आईला फोनही करायचा राहून जातो. आईच्या त्यागाचं मोल पटवून देणारी ही मालिका आहे आणि त्या मालिकेचा एक भाग होता आला याचा मला आनंद आहे. देवयानीनंतर पुन्हा एकदा स्टार प्रवाहसोबत मालिका करताना माहेरी आल्याचीच भावना आहे. देवयानी प्रमाणेच ‘आई कुठे काय करते’ या मालिकेवरही प्रेक्षक मनापासून प्रेम करतील याची मला खात्री आहे अशी भावना दीपालीने व्यक्त केली.’

 

 

तेव्हा न चुकता पहा नवी मालिका ‘आई कुठे काय करते’ २३ डिसेंबरपासून सायंकाळी ७.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर. 

Recommended

Loading...
Share