By  
on  

निवडणुकीच्या ‘धुरळ्या’मध्ये राडा नक्की करणार कोण?

‘धुरळा’ सिनेमाची चर्चा दिवसेंदिवस होताना दिसत आहे. या सिनेमात राजकारणाचा जोरदार धुरळा उडणार आहे. सरपंचपदावर विराजमान होण्यासाठी मातब्बरांची चाललेली स्पर्धा नवीन रिलीज झालेल्या गाण्यात दिसणार आहे. या गाण्यात अस्सल गावरान राजकारणाचा बाज पाहायला मिळणार आहे. ‘हव्वा कोणाची रं, हव्वा आपलीच रं असे बोल असलेल्या गाण्यात तुफान राडा पाहायला मिळत आहे. क्षितिज पटवर्धन यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत. ए व्ही प्रफुल्लचंद्र यांनी गाण्याचे बोल लिहिले आहेत. आदर्श शिंदे, मनीष राजगिरे आणि रुपाली मोघे यांनी या गाण्यावर स्वरसाज चढवला आहे. 

 

 

  समीर विद्वांस हे या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत. राजकारणाभोवती गुरफटलेल्या कुटुंबाची गोष्ट धुरळामध्ये दिसून येते. एका पाठोपाठ एक घरातील सदस्य निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यावर काय घडतं हे सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात सई ताम्हणकर, अंकुश चौधरी, प्रसाद ओक, अलका कुबल, अमेय वाघ, सिद्धार्थ जाधव, सोनाली कुलकर्णी अशी तगडी स्टार कास्ट आहे. हा मल्टिस्टारर सिनेमा 3 जानेवारी 2020 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive