पाहा Photos: गोव्याच्या किना-यावर येणार आण्णा-शेवंताच्या प्रेमाला भरती

By  
on  

रात्रीस खेळ चाले चा आगामी भाग रोमान्सने परिपुर्ण असणार आहे. कारण आण्णा आणि शेवंता गेलेत गोव्याला. आण्णाच्या कचाट्यातून सुट्ण्यासाठी शेवंता माधवसोबत मुंबईला जाण्याचं मान्य करते. पण आण्णांना हे समजताच ते परकोटीची मनधरणी करून तिला जाण्यापासून परावृत्त करतात. आता शेवंताने मुंबईला जाणं रहित केलं असलं तरी तिच्या मनात वेगळाच डाव सुरु आहे.

 

 

शिफॉन साडीमधील शेवंता आणि आण्णा गोव्यातील बीचवर रोमॅंटिक मूडमध्ये दिसत आहेत. शेवंताने पिवळ्या रंगाची शिफॉनची साडी नेसली आहे. तर आण्णांनी त्यांचा नेहमीचा शर्ट आणि विजार असा लूक केला आहे. पण एका मंदिरात शेवंता तिच्या चुकिची कबूली देताना दिसत आहे. त्यामुळे या गोव्याच्या ट्रीपमध्ये नक्कीच काहीतरी वेगळं घडणार आहे यात शंका नाही.

 

Pic courtesy - zee Marathi

Recommended

Loading...
Share