By  
on  

मराठी सिनेमातील या क्युट कपलचा फोटो तुम्हाला कसा वाटला?

मराठी सिनेमातील क्युट कपल प्रिया आणि उमेश कामत त्यांचे क्युट फोटो सोशल मिडियावर सतत शेअर करत असतात. फॅन्सही त्यांच्या फोटोवर कौतुकाचा वर्षाव करायला अजिबात विसरत नाहीत. आताही या जोडीने एक सुंदर फोटो शेअर केला आहे. यामध्ये प्रियाने पेस्टल ब्राऊन कलर साडी नेसली आहे. उमेशने ब्लॅक चेक्सचा कोट आणि व्हाईट पोलो शर्ट घातला आहे. या जोडीने नुकतीच एका मराठी चॅट शो मध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी असलेली मैत्रीचा प्रेम आणि लग्नापर्यंतचा प्रवास त्यांनी यावेळी शेअर केला. 

 

 

‘भेट’ या सिनेमाच्या दरम्यान या दोघांची पहिली भेट झाली. पण प्रिया आणि उमेशचा या सिनेमात एकही सीन एकत्र नव्हता. पण ‘वादळवाट’ मालिकेच्या दरम्यान त्यांची ओळख वाढली. भेटीगाठी मेसेजही वाढले. प्रियाने उमेशला मागणी घातली. त्यानंतर पाच वर्षं नात्यात राहिल्यावर या दोघांनी विवाह बंधनात अडकण्याचा निर्णय घेतला होता. अलीकडेच ते ‘आणि काय हवं’ या वेबसिरीजमध्ये एकत्र दिसले होते.

 

 

 

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive