रिंकूच्या भन्नाट अदाकारीने सजलेलं ‘मेक अप’चं नवीन गाणं पाहिलं का?

By  
on  

रिंकू राजगुरु आणि चिन्मय उदगीरकर यांच्या केमिस्ट्रीने सजलेला ‘मेक अप’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला. या फ्रेशजोडीमुळे या सिनेमाबत रसिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. आता या सिनेमातील नवीन गाणं रसिकांच्या भेटीला आलं आहे. ‘जुळली गाठ गं’ असं या गाण्याचे बोल आहेत. या गाण्यात लग्नाचा उत्साही माहोल दिसत आहे. रिंकू साडीमध्ये दिसत आहे. यासोबतच ती आणि चिन्मय भन्नाट डान्स करतानाही दिसणार आहे. 

 

 

शाल्मली खोलगडेने या गाण्यावर स्वरसाज चढवला आहे. तर ए. व्ही प्रफुल्लचंद्र यांचं संगीत आहे. या सिनेमात प्रतीक्षा लोणकर, मिलिंद सफई, राजन ताम्हाणे, सुमुखी पेंडसे, स्वाती बोवलेकर, तेजपाल वाघ हे कलाकार आहेत.सोहम रॉकस्टार एंटरटेनमेंट, बाला इंडस्ट्रीज अँड एंटरटेनमेंट प्रा. लि., शेमारू एंटरटेनमेंट लि. आणि ग्रीन ॲपल मीडिया प्रस्तुत या चित्रपटाचे निर्माता दीपक मुकूट, बी. बालाजी राव, हिरेन गाडा, नीरज कुमार बर्मन, अमित सिंग आहेत तर केतन मारू, कलीम खान सहनिर्माता आहेत. ७ फेब्रुवारी रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Recommended

Loading...
Share