By  
on  

मकरसंक्रांतीमुळे होणार सिद्धी आणि शिवाच्या नात्याची गोड सुरवात

'जीव झाला येडापिसा' मालिकेमध्ये लष्करे कुटुंब प्रत्येक सण मोठ्या जल्लोषात साजरा करतात. मकरसंक्रांत हा सण महाराष्ट्रात अतिशय उत्साह, आनंदामध्ये साजरा केला जातो. मकरसंक्रांतला सुवासिनी एकमेकिंना सुगडयाचे वाण देतात या वाणात हरभरे, मटर, बोरं, उस, गहु, तीळ, नाणे, असे असते. 'जीव झाला येडापिसा' मालिकेमध्ये लष्करे कुटुंब प्रत्येक सण मोठ्या जल्लोषात साजरा करतात. मालिकेमध्ये सिद्धी आणि शिवाच्या नात्याची मकरसंक्रांतीमुळे एक गोड सुरुवात झाली आहे... सिद्धीच्या मनात शिवाबद्दल आता प्रेम फुलू लागले आहे.

सिध्दी आणि शिवाची लग्नानंतरची पहिली मकर संक्रांत मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. मकरसंक्रांतीला काळे कपडे घालण्याची प्रथा आहे. सिध्दी काळ्या साडी मध्ये खूपच गोड दिसते आहे यात शंका नाही... मकर संक्रांतच्या निमित्ताने आत्याबाई शिवाच्या घरी येणार आहेत.

सिध्दीने मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर आत्याबाईंना पहिल्या हळदी कुंकु आणि तिळगुळाचा मान दिला. तेंव्हा नक्की बघा जीव झाला येडापिसा मालिकेचा मकर संक्रांती विशेष भाग या आठवड्यामध्ये रात्री ८.०० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive