By  
on  

सिनेमात येण्याअगोदर अशोक सराफ करायचे हे काम, वाचून बसेल धक्का

आपल्या कॉमिक टायमिंग आणि हावभावांनी प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणारे अभिनेते म्हणजे अशोक सराफ. अनेक सिनेमांमधून त्यांच्या अदाकारीला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. विनोदाची अचूक वेळ साधणं, यासाठी गरजेची असलेली वैचारिकता यांचा अचूक संगम अशोक सराफ यांच्या अभिनयात होता. 

अशोक सराफ 50 वर्षांहून अधिक काळ सिनेसृष्टीशी जोडले आहेत. जानकी या सिनेमातून त्यांनी सिनेमात पदार्पण केलं. पण तुम्हाला माहिती आहे का अशोक सराफ सिनेमात काम करत करत बॅंकेतही काम करत होते. एका मुलाखतीमध्ये त्यांनी ही बाब विशद केली. पहिला सिनेमा रिलीज झाल्यानंतरही त्यांनी बॅंकेत काम करणं थांबवलं नाही. 

सिनेमाचं शेड्युल आणि बॅंकेचं काम यांचा ताळमेळ साधत अशोक मामांनी अनेक सुपरहिट सिनेमे दिले. अशी ही बनवा बनवी, एक डाव भुताच, बाळाचे बाप ब्रम्हचारी, चोरीचा मामला, माझा पती करोडपती, नवरी मिळे नव-याला, आमच्या सारखे आम्हीच या आणि अशा अनेक सिनेमांनी अशोक सराफ यांना सुपरस्टार अशोक सराफ बनवलं. 

 

कोणत्याही अभिनेत्याने सतत प्रयोगशील राहिलं पाहिजे, हे तत्व अशोक मामांनी पुरेपूर जपलं. विनोदी भूमिकांसोबतच ‘बहुरूपी’, ‘भुजंग’, ‘कळत-नकळत’,’ अरे संसार संसार’, ‘भस्म’ या सिनेमांमधील हटके व्यक्तिरेखाही त्यांनी उत्तम साकारली. विनोदाचं अचूक मीटर जपणाऱ्या सराफ यांचे कित्येक संवाद आजच्या पिढीलाही पाठ आहेत.

 

त्यांनी साकारलेल्या भूमिकांसाठी संवादफेक करण्याची त्यांची शैली, आपल्या भूमिकेतलं वेगळेपण दाखवण्यासाठी घेतलेली मेहनत त्यांना सर्वोत्तम कलाकाराच्या सिंहासनावर बसवून गेली. या सगळ्यांचाच परिणाम की काय, आजही दार ठोकल्यावर धनंजय मानेंची आठवण आल्याशिवाय राहत नाही, तर सहज खोकतानाही वॉख्खॅ, विख्खी, विख्खू आपसूक आठवून जातं.....

 

Recommended

PeepingMoon Exclusive