‘हा आयुष्य बदलवणारा अनुभव’ म्हणत आदिनाथ कोठारेने शेअर केला, दिलीप वेंगसरकरांच्या लूकमधील फोटो

By  
on  

 कबीर खान दिग्दर्शित ‘83’ सिनेमातील कलाकारांचे वेगवेगळे लूक रसिकांसमोर येत आहेत. अभिनेता आदिनाथ कोठारेने या सिनेमातील त्याचा लूक शेअर केला आहे. आदिनाथ या सिनेमात दिलीप वेंगसरकरांच्या व्यक्तिरेखेत दिसणार आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये आदिनाथ म्हणतो, ‘त्यांनी 1983च्या वर्ल्ड कप विजयात मोलाची कामगिरी बजावली आहे. त्यांना पडद्यावर साकारणं हा खरोखरीच आयुष्य बदलणारा अनुभव होता. सादर करत आहे कोलोनेल दिलीप वेंगसरकर.’ 

 

 

 साजिद नाडियाडवाला, मधु मंतेना शिबाशीष सरकार आणि विष्णु इंदूरी यांच्या प्रॉडक्शनखाली बनत असलेला हा सिनेमा कबीर खान दिग्दर्शित करत आहेत. कबीर खान दिग्दर्शित '83' या सिनेमात रणवीर सिंग कपिल देव यांची प्रमुख भूमिका साकारत आहे. बॉलीवूडमधील या मोठ्या प्रोजेक्ट्चा भाग झाल्याने आदिनाथ भलताच खुश आहे. हा सिनेमा 10 एप्रिल 2020ला रसिकांच्या भेटीला येत आहे.

Recommended

Loading...
Share