सुरळीत सुरु असलेल्या नात्यात आलेला धमाल ट्वीस्ट दिसणार ‘मन फकिरा’च्या टीजरमध्ये

By  
on  

भुषण आणि रिया या दोघांचं लग्न उत्तम पार पडतं. पण एका नाजूक वेळेस दोघंही त्यांच्या पुर्वायुष्यातील नात्यांबाबत एकमेकांना सांगतात. अशा वेळी भुषण माही आणि रिया नचिकेतबाबत महत्त्वाचा निर्णय घेतात. हा निर्णय काय ते लवकरच कळेल. अभिनेत्री मृण्मयी देशपांडे ‘मन फकीरा’ या सिनेमाच्या माध्यमातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहे.  या चित्रपटात सुव्रत जोशी, सायली संजीव, अंजली पाटील आणि अंकित मोहन यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

 

 

अत्यंत प्रभावी आणि वेगळ्या पठडीतील अशी ही कथा मृण्मयीने स्वतः लिहिली आहे. आपल्याच कथेच्या माध्यमातून ती दिग्दर्शनात पदार्पण करते आहे.  अभिनेत्री मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित ‘मन फकीरा’ हा चित्रपट व्हॅलेन्टाईन्स डेच्या निमित्ताने म्हणजेच १४ फेब्रुवारी २०२० रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

Recommended

Loading...
Share