मराठी सिनेमाच्या लाडक्या सुनबाई होणार सासूबाई, झाला अलका कुबल यांच्या लेकीचा साखरपुडा

By  
on  

 मराठी सिनेमातील लोकप्रिय अभिनेत्री अलका कुबल यांची मुलगी इशानी हिचा नुकताच साखरपुडा झाला आहे. ईशानी ही अलका यांची मोठी मुलगी आहे. ईशानी अमेरिकेतील मियामी येथे पायलट आहे.

ईशानी दिल्ली येथील निशांत वालिया यांच्याशी एंगेज झाली आहे. निशांतही ईशानीप्रमाणेच मियामी येथे पायलट आहे. ईशानीने 2015मध्ये पायलटचं प्रशिक्षण घेतलं आहे. 

ईशानी आणि निशांतची रोका सेरेमनी झाली आहे. लग्नाची तारीख अजून समोर यायची आहे. आईप्रमाणे अभिनयाची वाट न चोखाळता ईशानीने पायलट व्हायचा मार्ग स्विकारला आहे.

 

Recommended

Loading...
Share