नील झालाय पुर्वीच्या प्रेमात वेडा, ‘मेक अप’ सिनेमातील हे नवं गाणं ऐकलं का?

By  
on  

रिंकू राजगुरु आणि चिन्मय उदगीरकर मेक अप सिनेमातून रसिकांच्या भेटीला येत आहेत. या सिनेमातील एक रोमॅंटिक ट्रॅक रसिकांच्या भेटीला आला आहे. ‘लागेना मन तुझ्याविना’ असे या गाण्याचे बोल आहेत. साहिल कुलकर्णीने हे गाणं गायलं आहे. ए.व्ही प्रफुल्लचंद्र यांनी या गाण्याला संगीत दिलं आहे. तर वैभव देशमुख यांनी बोल लिहिले आहेत. गणेश पंडित यांनी या सिनेमाच्या निमित्ताने दिग्दर्शनात पदार्पण केले असून या चित्रपटाचे लेखनही त्यांचेच आहे.

 

 

या सिनेमात प्रतीक्षा लोणकर, मिलिंद सफई, राजन ताम्हाणे, सुमुखी पेंडसे, स्वाती बोवलेकर, तेजपाल वाघ हे कलाकारही झळकणार आहेत. सोहम रॉकस्टार एंटरटेनमेंट, बाला इंडस्ट्रीज अँड एंटरटेनमेंट प्रा. लि., शेमारू एंटरटेनमेंट लि. आणि ग्रीन ॲपल मीडिया प्रस्तुत या चित्रपटाचे निर्माता दीपक मुकूट, बी. बालाजी राव, हिरेन गाडा, नीरज कुमार बर्मन, अमित सिंग आहेत तर केतन मारू, कलीम खान सहनिर्माता आहेत. 'मेकअप' सिनेमा ७ फेब्रुवारी रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

Recommended

Loading...
Share