By  
on  

प्रिया बापट-उमेश कामत चार वर्षांनी एकत्र झळकणार

अभिनेत्री प्रिया बापट आणि अभिनेता उमेश कामत हे मराठी सिनेसृष्टीतले मोस्ट लव्हेबल कपल म्हणून ओळखले जातात. ते दोघंही रील आणि रिअल लाईफमध्येसुध्दा मेड फॉर इच ्अदरच दिसतात. आता त्यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे, ती म्हणजे ही ख-या आयुष्यातले हे जोडीदार लवकरच ऑनस्क्रीन एकत्र झऴकणार आहेत. "अखेर आम्ही चार वर्षांनी एकत्र काम करतोय" ही आनंदवार्ता खुद्द उमेश कामतनेच आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन दिली. पण त्यांच्या या आगामी प्रोजेक्टबाबतची सविस्तर माहिती अद्यापतरी गुलदस्त्यातच आहे.

प्रिया आणि उमेश या दोघांची लव्ह स्टोरी  खूपच इंटरेस्टिंग आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मराठी नाटक, मालिका आणि सिनेमा या तिन्ही माध्यमात काम करतायत. त्यामुळे दोघांना एकमेकांबद्दल प्रचंड आदर होता आणि त्यामुळेच काम करता दोघांमध्ये मैत्रीचे बंधही निर्माण झाले. हळूहळू या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. २०११ मध्ये दोघं लग्नबंधनात अडकले.

नवा गडी नवं राज्य हे सुपरहिट नाटकांमधून प्रिया-उमेश या जोडीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. त्यानंतर आलेला टाईप्लीज हा त्यांचा सिनेमासुध्दा प्रेक्षकांच्या पसंतीस  उतरला. त्यामुळे आता त्यानंतर चार वर्षांनी हे कपल एकत्र झळकतंय. आता ते नाटक असेल सिनेमा की मालिका याबाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

https://www.instagram.com/p/BpYj0cfHJ2E/?taken-by=umesh.kamat

Author

Recommended

PeepingMoon Exclusive