By  
on  

प्राजक्ता माळी आहे दुबईत, शेअर केले तिने याचं खास कारण

अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या दुबईमध्ये आहे. दुबईमधील वातावरणाचा आनंद घेत तिने चाहत्यांसाठी काही फोटोही शेअर केले आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये ती म्हणते, ‘युएईमध्ये आहे एका ‘हिंग्लीश ट्रॅव्हल शो’चं होस्टींग करायला. अखेर एक नॉन मराठी शो साकारण्याची संधी मिळाली. यावेळी तुम्ही मला पाहू शकता ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर’….. 

 

 

प्राजक्ता मागील वर्षी ‘डोक्याला शॉट’ सिनेमात झळकली होती. याशिवाय ती महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाचं सुत्रसंचालनही करत आहे. प्राजक्ताचे फॅन्स तिला ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर पाहून खुष होतील यात शंका नाही.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive