सुबोध भावेने घेतली शरद पवारांची भेट, सुरु झाली बायोपिकची तयारी?

By  
on  

महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांची अभिनेते सुबोध भावे यांनी अलीकडेच भेट घेतली. राजकारणी साकारण्याची संधी मिळाली तर शरद पवार साकारायला आवडेल असं सुबोध यांनी बोलून दाखवलं होतं. ‘सातत्याने व्यक्त होणाऱ्या नेत्यांपेक्षा एक नेता जो योग्य ठिकाणी योग्य वेळ येताच व्यक्त होतो, अशा नेत्याची भूमिका करायला मला नक्कीच आवडेल, असे उद्गार यावेळी सुबोधने काढले’.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

पवारसाहेबांची भूमिका साकारण्याची इच्छा सुबोध भावे यांनी याआधीच व्यक्त केली आहे. सातत्याने व्यक्त होणाऱ्या नेत्यांपेक्षा एक नेता जो योग्य ठिकाणी योग्य वेळ येताच व्यक्त होतो, अशा नेत्याची भूमिका करायला मला नक्कीच आवडेल, असे उद्गार @subodhbhave यांनी काढले आहेत. संवेदनशील व सामाजिकदृष्ट्या सजग भान असलेले अभिनेते, लेखक, दिग्दर्शक व निर्माते सुबोध भावे (@subodhbhave ) यांनी आज आदरणीय खा. शरद पवारसाहेबांची सौजन्य भेट घेतली. @pawarspeaks #maharashtra #sharadpawar #mahavikasaghadi #ncp_maharashtra_updates #king #politics #ncp #subodhbhave

A post shared by Nationalist Congress Party (@ncp_maharashtra_updates) on

 

या भेटीमागचं कारण नक्की काय होतं हे समजू शकलं नाही. बायोपिक आणि सुबोध भावे हे एक समीकरण आहे. सुबोधने आतापर्यंत बालगंधर्व, लोकमान्य टिळक, काशिनाथ घाणेकर या चरित्र भूमिका पडद्यावर उत्तमपणे रंगवल्या. येत्या काही दिवसांमध्ये सुबोध भावे थोर आणि ज्येष्ठ राजकारणी शरद पवार यांच्या भूमिकेत दिसला तर आश्चर्य वाटायला नको.

Recommended

Loading...
Share