By  
on  

‘सिटी ऑफ ड्रीम्सच्या दुस-या सीझनला सुरुवात, प्रिया बापटचा हा लूक पाहिला का?

‘सिटी ऑफ ड्रीम्स’ या वेबसिरीजची लोकप्रियता पाहून मेकर्सनी दुसरा सीझन आणायचंही नक्की केलं आहे. अभिनेत्री प्रिया बापटने नुकताच या सेटवरचा एक फोटो शेअर केला आहे. या पोस्टमध्ये प्रिया म्हणते, ‘ असं काही तरी ज्याची आम्ही वाट पाहात आहोत.’ हा सिरीजचा पहिला सीझन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. प्रिया या वेबसिरीजमध्ये पूर्णिमा गायकवाड ही व्यक्तिरेखा साकारत आहे. एक महत्वाकांक्षी, आत्मविश्वासू अशी ही व्यक्तिरेखा पहिल्या सीझन मध्ये पाहायला मिळाली होती. 

 

 

 
हा सीझन प्रियाच्या किसिंग सीनमुळेही गाजला होत. अभिनेत्री गितीका त्यागी आणि प्रिया बापट यांच्यामध्ये असलेल्या बोल्ड दृश्यांमुळे अभिनेत्री प्रिया बापटला सोशल मीडिया वर ट्रोल केलं गेलं. पण प्रियाच्या चाहत्यांनी तिच्या धाडसाबद्दल कौतुकाचा वर्षाव केला गेला. आता दुस-या सीझनमध्ये काय असेल याची उत्सुकताही चाहत्यांमध्ये असेल यात शंका नाही.

 

Recommended

PeepingMoon Exclusive