By  
on  

Bonus Song: प्रेक्षकांना मिळणार ‘रॅप साँग’चा ‘बोनस’, नवीन गाणं रसिकांच्या भेटीला

हिंदी सिनेमात रॅप साँगनी प्रसिद्धी मिळवल्यानंतर हा प्रकार आता मराठी सिनेमातही येऊ घातला आहे. पुजा सावंत आणि गश्मीर महाजनी दिग्दर्शित ‘बोनस’ सिनेमातील रॅप साँग रसिकांच्या भेटीला आलं आहे. ‘माईक दे’ असे या गाण्याचे बोल आहेत. या निमित्ताने धमाल गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. यात गश्मीर रोजच्या अडचणींशी लढताना दिसत आहे. तर या गाण्यात पुजा सावंतचा बिनधास्त अंदाज दिसत आहे. ऋषीकेश जाधव याने हे रॅप गायलं आहे. 

 

 

 निर्माते अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशानदार हे ‘लायन क्राऊन एंटरटेन्मेंट’, गोविंद उभे, एन अनुपमा आणि कांचन पाटील यांच्यासोबत या सिनेमाची सहनिर्मिती करत आहेत. ‘लायन क्राऊन एंटरटेन्मेंट’ आणि ‘जीसिम्स’ यांची प्रस्तुती असलेल्या या सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन सौरभ भावे यांनी केले आहे. ‘बोनस’  हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात २८ फेब्रुवारी २०२० रोजी प्रदर्शित होत आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive