रणभूमीवर जिंकण्याआधी मनभूमीवर विजय मिळवण्याची प्रेरणा देणारा ‘विजेता’चा टीजर पाहाच !

By  
on  

सुबोध भावे आगामी विजेता सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाचा टीजर नुकताच रिलीज झाला आहे. उर्जेने भरलेला हा टीजर प्रत्येकाला नवीन उमेद देईल असाच आहे. या टीजरमध्ये प्रत्येक खेळाडू जीवतोड मेहनत करताना दिसत आहे. महाराष्ट्राला विजेतेपद मिळवून देण्यासाठी प्रत्येक खेळाडू मेहनत करताना दिसत आहे. या व्हिडियोमध्ये सुशांत शेलार ‘हे माईंड कोच वगैरे सगळं फॅड आहे’. असं म्हणतानाही दिसतो. 

 

 

बॉक्सिंग, वेटलिफ्टींग, गोळाफेक, सायकलिंग या खेळाचं दर्शनही या टीजरमधून घडतं. सुबोध भावे, पुजा सावंत, माधव देवचके, सुशांत शेलार, मानसी कुलकर्णी ,तन्वी किशोर, देवेन्द्र चौगुले, दिप्ती धोत्रे, कृतिका तुळसकर आणि गौरीश शिपुरकर हे या सिनेमात आहेत. 
सुबोधचा या सिनेमातील लूक पाहता या सिनेमात तो प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसत आहे. याशिवाय सुशांत शेलारही प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसत आहे. हा सिनेमा 12 मार्च 2020ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

Recommended

Loading...
Share