एका चिमुरडीची ही विनंती ऐकून अमोल कोल्हेंनाही वाटलं कौतुक

By  
on  

‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिकेतील अलीकडील एपिसोड्स  प्रत्येकालाच भावनिक करणारे आहेत. संभाजी महाराजांना झालेली कैद, त्यानंतर त्यांचे झालेले हाल हा इतिहास प्रत्येकालाच माहिती आहे. त्यामुळे महाराजांच्या कैदेचा एपिसोड प्रत्येकाच्याच डोळ्यात पाणी आणणारा आहे. छत्रपती संभाजी महाराज साकारणा-या अमोल कोल्हे यांना आलेला हृदयस्पर्शी अनुभव त्यांनी चाहत्यांशी शेअर केला आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Dr. Amol Kolhe (@amolrkolhe) on

 

अमोल यांना मतदारसंघात एक चिमुरडी भेटली. त्यावेळी तिने अमोल यांना डोळ्यात पाणी आणून सांगितलं की ‘आज बाहेर जाऊ नका. माझ्या घरी चला. नाहीतर ते तुम्हाला पकडतील.’ तिच्या निरागस आर्जवाने अमोल कोल्हेही भारावले.  ही मालिका आता शेवटाकडे जाताना दिसत आहे. फितुरीचा प्रोमो रिलीज झाल्यावर नेटिझन्सनीही भावनिक कमेंट केल्या होत्या.

Recommended

Loading...
Share