By  
on  

कच्च्या नात्याची पक्की ओढ दिसतीये पांघरुणमधील ‘ही अनोखी गाठ’ या गाण्यात

बिग बॉसच्या दुस-या सीझन दरम्यान अभिनेते महेश मांजरेकर यांनी त्यांच्या आगमी ‘पांघरुण’ सिनेमाबाबत सुतोवाच केलं होतं. आता या सिनेमातील गाणं रसिकांच्या भेटीला आलं आहे. ‘ही अनोखी गाठ’ असे या गाण्याचे बोल आहेत. लहान वयातील मुलीचा दोन मुलीचा बाप असलेल्या प्रौढ व्यक्तीशी विवाह होतो त्यावेळी तिच्या मनातील घालमेल या गाण्यातून दाखवली आहे. 

 

 

बिग बॉसच्या एका एपिसोडमध्ये महेश यांनी या गाण्याची झलक दाखवली. या गाण्यात महेश यांची मानसकन्या गौरी इंंगवले सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तिच्यासोबत या सिनेमात अमोल बावडेकर दिसत आहे. गौरीचा हा पहिला सिनेमा असला तरी कॅमेरासमोर तिची सहजता दिसून येते. विजय प्रकाश यांनी हे गाणं गायलं आहे. वैभव जोशींचे बोल आहेत. या गाण्याचा बाज रोमॅंटिक असल्याने प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल यात शंका नाही.

Recommended

PeepingMoon Exclusive