By  
on  

पाहा Trailer : 'अश्लिल उद्योग मित्र मंडळ' आहे, सविता भाभीच्या शोधात

 युवा दिग्दर्शक आलोक राजवाडेचा अश्लिल उद्योग मित्र मंडळ हा सिनेमा येत्या  ६ मार्च रोजी रसिकांच्या भेटीला येत आहे, तत्पूर्वी  सिनेमाचा बहुचर्चित ट्रेलर रसिकांच्या भेटीला येतोय. पर्ण पेठे, अभय महाजन आणि सई ताम्हणकर यांच्या सिनेमात प्रमुख भूमिका आहेत. . एका मंडळाच्या दहीहंडी उत्सवात सेलिब्रेटी म्हणून सविता भाभीला आणण्याचा निर्णय होतो. तर पर्ण पेठेच्या ‘हे बघ, आपण ४० वर्षांचे झालो आणि आपल्याला कुणी नाही मिळाले तर आपण एकमेकांशी लग्न करू’ या वाक्याने ट्विस्ट निर्माण झालं आहे. तसेच सई ताम्हणकरच्या ‘मैं वहाँ आकर आपनी इमेज गवां दुंगी, अपनी मिस्ट्री गवां दुंगी, तूम क्या गवां दोगे?’ या प्रश्नावर अभय महाजन ‘व्हर्जिनिटी’ असे उत्तर देतो यातून सिनेमाबद्दलची उत्कंठा अधिकच ताणली गेली आहे.

 

लव्ह, लस्ट आणि धोका असे  विविध रंगसुध्दा या ट्रेलरमध्ये पाहायला मिळाले. तर अभिनेता अमेय वाघची एक ओझरती झलकसुध्दा या ट्रेलरमध्ये पाहायला मिळतेय. त्यामुळे एकूणच नेमकी कथा कशी उलगडणार  हे जाणून घेण्यासाठी सिनेमा प्रदर्शित होण्याची वाट पाहावी लागेल. 

अभय महाजन आणि पर्ण पेठेची प्रमुख  भूमिका असलेल्या ‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’ मध्ये सायली पाठक, अक्षय टांकसाळे, ऋतुराज शिंदे, केतन विसाळ, विराट मडके यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका असून सई ताम्हणकर आणि अमेय वाघ विशेष भूमिकेत पाहायला मिळतील. 

आलोक राजवाडे दिग्दर्शित आणि आर. आर. पी. कॉर्पोरेशन निर्मित   ‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’  ६ मार्च रोजी प्रदर्शित होत आहे. 

 

Recommended

PeepingMoon Exclusive