By  
on  

अमृता सुभाषला ‘गली बॉय’साठी मिळाला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार

बॉलिवूडमधील मानाचा समजला जाणारा फिल्मफेअर अ‍वॉर्ड सोहळा अलीकडेच पार पडला. या सोहळ्यात जास्त भाव खाऊन गेला तो ‘गली बॉय’ सिनेमा. गलीबाॅयनं आजवर फिल्मफेअरच्या इतिहासांत सर्वात जास्त म्हणजे १३ पुरस्कार मिळवण्याचं रेकाॅर्ड केलं. या सिनेमाने या अ‍वॉर्ड सोहळ्यात सर्वात जास्त पुरस्कार मिळवले. या सिनेमात ‘रजिया’ची भूमिका साकारणारी अमृता सुभाष ही या पुरस्काराची मानकरी ठरली. अमृताला या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. अमृताने यावेळी केलेल्या आभार प्रदर्शनात कार्यक्रम स्थळ असलेल्या आसामचे आभार मानले. 

 

 

यावेळी ती म्हणाली ‘माझं स्वप्न पुर्ण झाल्यासारखं  वाटत आहे. हा माझा पहिला हिंदी अ‍वॉर्ड आहे.’ अमृताला रझियाच्या लूकसाठी वयापेक्षा जास्त मोठ दिसायचं होतं. यावेळी तिला मेक अप मन आणि हेअर ड्रेसर यांची खुप मदत झाली. अमृताने त्यांचेही यावेळी आभार मानले. याशिवाय या सिनेमात रणवीरच्या आजीची म्हणजे रजियाच्या सासूची भूमिका ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती सुभाष यांनी साकारली होती. हे देखील तिने यावेळी नमूद केलं.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive