गुंतलेल्या नात्यांची हटके स्टोरी, ‘मन फकिरा’च्या दुस-या ट्रेलरमध्ये

By  
on  

अभिनेत्री मृण्मयी देशपांडे ‘मन फकीरा’ या सिनेमाच्या माध्यमातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत असून या सिनेमाचा दुसरा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटात सुव्रत जोशी, सायली संजीव, अंजली पाटील आणि अंकित मोहन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. नात्यांचा खुला आलेख या ट्रेलरमध्ये दिसतो. नचिकेत आणि माहीच्या प्रेमात असलेले सायली आणि सुव्रत एकमेकांशी लग्न करतात खरे पण पहिल्या नात्यातून बाहेर न आल्याने पुन्हा पहिल्या नात्याला संधी देण्याचा विचार करतात.

 

 

यासाठी दोघंही नचिकेत आणि माहीला भेटण्यासाठी जातात. आता पुढे काय घडते हे सिनेमात कळेलच. ही कथा मृण्मयीने स्वतः लिहिली आहे. हे दोघेही पुर्वाश्रमीच्या नात्यात परतात का? या प्रवासादरम्यान त्यांच्यात फुललेली मैत्रीचं रुपांतर प्रेमात होतं का हे पाहण्यासाठी हा सिनेमा पाहावा लागेल. या सिनेमाचे संगीत दिग्दर्शक व गायक सिद्धार्थ महादेवन, सौमिल श्रींगारपुरे, यशिता शर्मा, गौतमी देशपांडे, निकिता गांधी यांनी केलं आहे. अभिनेत्री मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित ‘मन फकीरा’ हा सिनेमा 6 मार्चला रसिकांच्या भेटीला येणार आहे.

Recommended

Loading...
Share