By  
on  

अभिनेत्रींच्या सौंदर्यात भर घालणारे ज्येष्ठ रंगभूषाकार पंढरी दादा जुकर यांचं निधन

आपल्या रंगकौशल्याने समोरच्या व्यक्तीच्या लूकमध्ये चार चांद लावणारे ज्येष्ठ मेक अपमॅन पंढरी दादा जुकर यांचं निधन झालं आहे. ते 87 वर्षांचे होते. गेली 60 वर्षं ते अविरतपणे बॉलिवूडचे मेक अप म्हणून काम करत होते. ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट सिनेमांपासून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली आहे. ज्येष्ठ सिनेपत्रकार, समीक्षक दिलीप ठाकूर यांनी पंढरीदादांबद्दलच्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणतात, ‘ पंढरीदादांनी त्यांच्या कलाकौशल्याने एक काळ गाजवला. ते केवळ चेहरा रंगवायचे नाहीत तर व्यक्तिरेखा कशी आहे याचा अभ्यास करायचे याशिवाय मेक अप कॅमेरासमोर कसा दिसेल याचाही अभ्यास केला. सिनेमासाठी कसा मेक अप असावा. फोटो सेशनसाठी कसा मेक अप असावा याचाही अंदाज घ्यावा. काळासोबत त्यांनीही कलाकौशल्यात बदल स्विकारला. त्यामुळेच ते अलीकडच्या काळातील कलाकारांचा मेक अप सहज करायचे’.

नर्गिसपासून माधुरी दीक्षित यांच्यापर्यंत अनेक अभिनेत्रींचं सौंदर्य त्यांनी खुलवलं. नर्गिस यांनी त्यांचं मेक अप कौशल्य पाहून त्यांना परदेशी जाऊन अ‍ॅडव्हान्स मेक अप ट्रेनिंग घेण्यास मदत केली होती. यश चोप्रांच्या जवळपास सगळ्याच सिनेमात पंढरी दादा यांनी मेकअप मनची भूमिका साकारली आहे. उद्या सकाळी 8 ते 10 त्यांच्या राहत्या घरी अंत्यदर्शन घेता येेणार आहे.त्यानंतर अंत्यविधी होतील त्यांच्या जाण्याने अनुभवी मेकअप मॅन हरवल्याची भावना निर्माण होत आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive