लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी घेतला इंदौरमध्ये ‘अ परफेक्ट मर्डर’ नाटकाचा आनंद

By  
on  

अलीकडेच मराठी नाटक ‘अ परफेक्ट मर्डर’च्या इंदौरमधील प्रयोगाला लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी हजेरी लावली सुमित्रा महाजन या इंदौरच्या आहेत. यावेळी ‘अ परफेक्ट मर्डर’ या नाटकाचे इंदौरमध्ये प्रयोग सुरु आहेत. ‘अ परफेक्ट मर्डर’ एक थ्रिलर नाटक आहे. निरंजन आणि मीराच्या आयुष्यात कमलेश नावाचं वादळ येतं. मग काय घडतं. हे या नाटकात पाहता येईल.

 

प्रसिद्ध दिग्दर्शक विजय केंकरे यांनी हे नाटक दिग्दर्शित केलं आहे. या नाटकात पुष्कर श्रोत्री, अनिकेत विश्वासराव, श्रीकांत प्रभाकर, सुबोध पंडे हे कलाकार आहेत. सर अल्फ्रेड हिचकॉक यांच्या कथेवर बेतलेलं  एक खुन आणि त्यात्याभोवती फिरणारं हे कथानक प्रेक्षकांना खिळवून ठेवतं.

 

Recommended

Loading...
Share